आधीच्याच रेसिपी सारखीच झटपट आणि पटपट होणारी प्रत्येक सुगरणीला आवडेल आणि जमेल अशी रेसिपी
घेऊन आलो आहोत प्रत्येकाचा असा आवडीचा समोसा पण वेगळ्या रूपात.
घरी अचानक पाहुणे आले की आपण लगेच दुकानात जाऊन सामोसे आणतो पण तोच समोसा आपण घरीच बनवला तर.
साहित्य- एक वाटी मैदा,ओवा, थोडं तेल, 2बटाटे, मटार फ़ोडणी साठी राई जिरं आणि चवीनुसार गरम मसाले आणि मीठ.
कृती- मैदा ओवा एक छोटा चमचा तेल छान मिक्स करून घ्या, पिठात तेल छान मुरला की त्यात पाणी मिसळून मऊसर पीठ मळून घेऊन 15 ते 20 मिनिटे ते झाकून ठेवा.
सारणासाठी भाजी तयार करून घ्या.
मळलेल्या पीठाच्या छोट्या पोळ्या लाटून घेऊन त्याचे कोन बनवून घ्या . बनवलेले कोन गरम तेलात तळून घ्या.
तळलेल्या कोनमध्ये चिंचेची चटणी आणि तिखट हिरवी चटणी घालून भाजीचे सारण भरून त्यावर शेव भुरभुरावी.
तयार आहे आपला रत्नागिरी स्पेशल समोसा.
आपल्याला हवे असल्यास आपण कोन आधीच बनवून स्टोर करून ठेऊ शकतो.
तुम्ही पण बनवून पहा आणि तुमचे reviews नक्की share करा.
Nakkich try karu he recipe
ReplyDeletePlease try 👍😊
ReplyDelete