उत्तप्पम म्हणजे काही रॉकेट science वापरून केलेला पदार्थ नाही, आपण जो परंपरिक पदार्थ बनवतो तोच वेगळ्या स्वरूपात थोडा modifiy करून बनवला की खाणार्याला पण आपण काही तरी नवीन खाल्लं अस वाटतं.
साहित्य:- 2वाटी उडीद, 2 वाटी तांदूळ रात्री भिजत घालून ठेवावेत (4 तासांसाठी भिजवावेत) मिक्सर मध्ये छान वाटून घ्यावे. 2 कांदे, 4 मिरची (तिखट हवे असेल तर अजून थोडे घ्या),2 टोमॅटो बारीक चिरून ठेवावीत.
कृती- बारीक चिरलेली कांदा, टोमॅटो आणि मिरची मिश्रणात मिक्स करून घ्यावी. आप्पे पत्राला ब्रशने थोडे तेल लावून मिश्रण पात्रात घालावे. 5 मिनिटे झाल्यावर दुसरी बाजू पलटी करून शिजू द्यावी.
तयार आप्पे खोबऱ्याच्या किंवा पुदिन्याच्या चटणी बरोबर सर्व्ह करावेत.