Friday, June 7, 2019

Pinewheel Samosa

या आधीच्या रेसिपी मध्ये पण आपण समोसा try केला होता आता सुद्धा आपण समोसा पण थोड्या वेगळ्या रूपात try करणार आहोत. नेहमी प्रमाणेच झटपट  आणि पटपट होणारी प्रत्येक सुगरणीला आवडेल आणि जमेल अशी रेसिपी
घेऊन आलो आहोत. अचानक भयानक कधी पण जेव्हा आपले मन करेल तेव्हा किंवा घरी पाहुणे येणार असतील तेव्हा, आपल्या डाएट conscious मैत्रिणींसाठी समोसा आपण घरीच बनवला तर.

साहित्य- एक वाटी मैदा, थोडं तांदुळाचे पीठ, जिरं,ओवा, थोडं तेल, 2बटाटे, मटार फ़ोडणी साठी राई जिरं आणि चवीनुसार गरम मसाले, आमचूर पावडर, धनिया पावडर, बडीशोप, हिरवी मिरची आणि मीठ.

कृती-  मैदा तांदुळाचे पीठ आणि ओवा एक छोटा चमचा तेल छान मिक्स करून घ्या, पिठात तेल छान मुरला की त्यात पाणी मिसळून मऊसर पीठ मळून घेऊन 15 ते 20 मिनिटे ते झाकून ठेवा.
सारणासाठी भाजी- तेलात जीरं आणि मिरचीची फोडणी देऊन उकडलेले बटाटे घालावेत वरून धनिया पावडर,थोडी बडीशोप, गरम मसाला , आमचूर पावडर आणि मीठ घालून चांगला शिजवून घ्यावी.
मळलेल्या पीठाच्या पोळी लाटून घेऊन त्यावर भाजी पसरवून पोळी रोल करावी आणि तिचे 1 cm चे कप करून गरम तेलात तळून घ्या.
तळलेले pinewheel चिंचेची चटणी आणि तिखट हिरवी चटणी सोबत serv करावेत .

आपल्याला हवे असल्यास आपण रोल आधीच बनवून स्टोर करून ठेऊ शकतो.
तुम्ही पण बनवून पहा आणि तुमचे reviews नक्की share करा.
पावसाळा जवळ आलाच आहे तर बरसणाऱ्या पावसात आपल्या प्रियजनांना नक्कीच खाऊ घाला Pinewheel Samosa.