Monday, December 24, 2018

रत्नागिरी स्पेशल कोन सामोसा

आधीच्याच रेसिपी सारखीच झटपट  आणि पटपट होणारी प्रत्येक सुगरणीला आवडेल आणि जमेल अशी रेसिपी
घेऊन आलो आहोत प्रत्येकाचा असा आवडीचा समोसा पण वेगळ्या रूपात.
घरी अचानक पाहुणे आले की आपण लगेच दुकानात जाऊन सामोसे आणतो पण तोच समोसा आपण घरीच बनवला तर.

साहित्य- एक वाटी मैदा,ओवा, थोडं तेल, 2बटाटे, मटार फ़ोडणी साठी राई जिरं आणि चवीनुसार गरम मसाले आणि मीठ.

कृती-  मैदा ओवा एक छोटा चमचा तेल छान मिक्स करून घ्या, पिठात तेल छान मुरला की त्यात पाणी मिसळून मऊसर पीठ मळून घेऊन 15 ते 20 मिनिटे ते झाकून ठेवा.
सारणासाठी भाजी तयार करून घ्या.
मळलेल्या पीठाच्या छोट्या पोळ्या लाटून घेऊन त्याचे कोन बनवून घ्या . बनवलेले कोन गरम तेलात तळून घ्या.
तळलेल्या कोनमध्ये चिंचेची चटणी आणि तिखट हिरवी चटणी घालून भाजीचे सारण भरून त्यावर शेव भुरभुरावी.
तयार आहे आपला रत्नागिरी स्पेशल समोसा.

आपल्याला हवे असल्यास आपण कोन आधीच बनवून स्टोर करून ठेऊ शकतो.
तुम्ही पण बनवून पहा आणि तुमचे reviews नक्की share करा.

Thursday, June 7, 2018

चीझ पाव भाजी पिझ्झा कपकेक

        हि माझी पहिली पोस्ट माझ्या नव्याकोऱ्या ब्लॉग वर. पहिली पोस्ट म्हणजे मेनू पण तसाच हवा ना म्हणून  लहान मुलांच्या अगदी जवळचा असा हा पिझ्झा नवीन प्रकारे प्रेझेन्ट करायचा ठरवलं.
     लहान मुलांच्या बर्थडे पार्टी मध्ये एक छानसा मेनू नक्की होईल हा पिझ्झा.
    पण टेन्शन नॉट थोडासाच आणि मोजकाच खाऊ असा पिझ्झा आपण बनवू शकतो घरच्या घरी

साहित्य :-पावासाठी साहित्य :- मैदा, ड्राय यीस्ट, पाणी, मीठ, तेल ,साखर
              टॉपपिंग्ससाठी  साहित्य :-  शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, मक्याचे दाणे,  पाव भाजी मसाला, गरम मसाला, मीठ ,सजावटी साठी चीझ

कृती :- सर्व प्रथम ५ग्राम ड्राय यीस्ट कोमट पाण्यात साखरे सोबत मिक्स करून १० मिनिटे ठेवावे..
          नंतर मैदा घेऊन त्यात ते यीस्ट मिक्स करून गरजे नुसार पाणी थकून मऊसर पीठ मळून  घ्यावे. मळून झाल्यावर मीठ आणि तेल घेऊन पुन्हा एकदा पीठ चांगले मळून घ्यावे. त्या गोळ्यावर अर्ध्या तासासाठी ओला कापड ठेऊन तोच फुलून द्यावा. 
आता टॉपपिंग्स  करण्यासाठी सर्व भाज्या उभ्या चिरून घ्याव्यात. कढई मध्ये तेल गरम करून त्यात कांदा परतून  घेऊन बाकीच्या सर्व भाज्या त्यात टाकाव्यात नंतर गरम मसाला पाव भाजी मसाला आणि चवीपुरता मीठ टाकून भाजी थोडा वेळ शिजून द्यावी .

   आता कपकेक चा ट्रे घेऊन त्याला तेल लावून घ्यावे नंतर आपण करून ठेवलेल्या गोळ्याच्या छोट्या छोट्या जाडसर पुऱ्या लाटून त्या ट्रे मध्ये लावून घ्याव्यात आणि त्यात स्टफीन्ग भरून त्या वर किसलेला  चीझ टाकून २००  डिग्री वर PREHEATED ओव्हन मध्ये १० मिनिट साठी ठेवावा
१० मिनिट मध्ये आपला कपकेक पिझ्झा तयार .